एसटीच्या विश्रामगृहात दारूच्या बाटल्या

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : येथील मध्यवर्ती बसस्थानकाच्या विश्रामगृहात सोमवारी (दि.२६) दारूच्या बाटल्या आढळून आल्या, मात्र ५१ चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचार्‍यांनी मद्यप्राशन केले नसल्याचेही आढळून आले. मात्र या प्रकाराची एसटी प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.
परळ येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्व विभाग नियंत्रकांना मंत्री प्रताप सरनाईक यांनी परगावी कर्तव्य बजावणार्‍या चालक-वाहकांसाठी विश्रांतीगृहांमध्ये उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले होते. अशा ठिकाणी मद्यपानासारखे निंदनीय कृत्य घडत असेल, तर ते केवळ शिस्तभंग नाही तर प्रवाशांच्या जीवाशी थेट खेळ करणारे अत्यंत धोकादायक कृत्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.